कारंजा :
आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या शेती वहीवाटीच्या रस्ताकरीता आणि शेतीत साचणारे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आर्वी येथील रेस्ट हॉऊस मध्ये समृद्धी महामार्गचे अधीक्षक अभियंता जनबंधु यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने नागपूर – मुंबई प्रवास सुखकर होणार आहे. या महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला. परंतु त्या क्षेत्रातील उर्वरित शेतांना शेतीकरीता पुर्वी असणाऱ्या शिव पांधनी बाधित झालेल्याने शिल्लक शेत जमिनीला पोहचण्यासाठी रस्ते करने गरजेचे आहे. विरूळ लगतचे ४५ शेतकरी यामुळे शेती वहीवाटीच्या रस्तांना मुकले आहे.
बैठक दरम्यान शेती करीता वहीवाटीच्या रस्तांचा व शेतीत साचनारे पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे निर्देश आमदार दादाराव केचे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी सांगितले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, अक्षय कांबळे, राहुल धोंगड, जगदीश दावेदार, देवेंद्र सालंकार, विनोद सातपुडके, संजय मानकर, पुरुषोत्तम खंडारे, पांडुरंग बुभुतकार यांच्यासह विरूळ परीसरातील शेतकरी उपस्थित होते.