Tuesday, June 28, 2022
Homeवर्धासमुद्रपूर पंचायत समितीच्या सभापती पदी सुरेखा टिपले

समुद्रपूर पंचायत समितीच्या सभापती पदी सुरेखा टिपले

समुद्रपूर : – पंचायत समिती विद्यमान सभापती यांनी राजीनामा दिल्याने 22 फेब्रुवारी रोजी सभापदी पदाची निवडणूक घेण्यात आली यात सुरेखा टिपले यांची अविरोध निवड करण्यात आली.

मागील निवडणूकीत सभापती पद सव्वा सव्वा वर्ष घेण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे सभापती पुष्पाजंली किशोर नेवल यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सोमवार 22 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली .या निवडणुकीत सुरेखा कैलास टिपले यांची पंचायत समितीच्या सभापती पदी अविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सभागृहात उपसभापती योगेश फुसे, सदस्य पुष्पाजंली नेवल, जयश्री दांडेकर, सुनिल डुकरे, वसंता घुमडे, शांताराम बगडे कांचन मडकाम यांची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित सभापती सुरेखा कैलास टिपले यांचे आमदार समीर कुणावार यांनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाच्या वेळी किशोर दिघे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे, संजय डेहणे, आकाश पोहाणे यांनी सुध्दा आभिनंदन केले.
यावेळी रवि दांडेकर, बालू इंगोले, कैलास टिपले, गोपाळराव वंगळ, रामा तडस, सुवर्णा तडस, रोशन चौके, संजिवनी राऊत,
राजूभाऊ नौकारकार, विजय तडस, राजू नवघरे, प्रमोद चौघे, बलराम राऊत, ईश्वर सुपारे, गजानन दांडेकर गजानन वैद्य याची उपस्थिती होती .यावेळी
गटनेते पदी सुनिल डुकरे, यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular