समुद्रपुर:-
शहरातील मुख्य रस्ता आता नव्हाने बनवला परतु तो रस्ता अरुंद झाल्याने शहरातील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
पहिला रस्ता हा दोन्ही साईडने खुला असल्याने गाड्या बरोबर निघुन जात असायच्या परंतु आता नव्याने सिमेंट रोड बनला व त्यात डिवाडर बसले परंतु या रस्तातुन फक्त एकच गाडी निघत असल्याने दुसऱ्या गाड्या निघत नाही व अपघात होत आहे. त्याच प्रमाणे झेंडा चौकातील वळन रस्ता पण अरुंद झाल्याने शहरातील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

आज सकाळी उमरेड हिंगणघाट बस हि उमरेड वरुन येत असताना लक्ष्मी किराणा भंडार जवळ रोड वर एक कार उभी असल्याने बस चालकाला बस दुसऱ्या साईडनी काढायला गेल्या असल्याने बसचा पुढचा चक्का गठु बनवायच्या लोखडी डा्प ला भिडला असता बसचा टायर चिरडला तर बस चालकाला बस काढणे महागात पडले आहे.
शहरातील नागरिकांनी हा रोड मोठा करण्यास विनंती केली. परंतु यावर कुठलीही उपाय योजना केल्या जात नसल्याने शहरातील अपघाताचे प्रमाण वाढले असून पुढेही असेच अपघात घडत राहातील असे नागरिकांचे म्हणणे आहे.