Monday, June 27, 2022
Homeवर्धासंभाजी ब्रिगेड मध्ये तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात तरुणांचा जाहीर प्रवेश.

संभाजी ब्रिगेड मध्ये तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात तरुणांचा जाहीर प्रवेश.

वर्धा : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात व जिल्हा प्रमुख मंगेश विधळे यांच्या मार्गदर्शनात संभाजी ब्रिगेड मध्ये तरुणांनी जाहीर प्रवेश केला,
आधार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे व एल्गार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष मेश्राम यांच्यासोबतच विक्की श्रिरामे,गुजंनभाऊ मेढुंले ,अमित शेदंरे,रतन ढोले ,निखिल श्रीरामे,रोशन घाडे,कुणाल जोगी,सुरज राजपूत,विकी श्रीरामे,अजित घाडे,स्वप्नील कांबळे,आशिष दीघाडे,आशिष दुबे,निखिल कडू,भूषण चौधरी

कोविडच्या पार्श्वभूमीवर अगदी सध्या पद्धतीने व कमीत-कमी लोकांमध्ये हा प्रवेश कार्यक्रम पार पडला, येणाऱ्या काळामध्ये वर्धा जिल्ह्यात शेतकरी,कामगार,विद्यार्थी,महिला यांचे प्रश्न प्रामाणिकपणे व धडाडीने सोडविण्याची व महापुरुषांचे विचार समाजात पेरून निर्व्यसनी,वैचारिक तरुण निर्माण करण्यासाठी झटण्याची व स्वतः निर्व्यसनी राहण्याची सामुदायिक शपथ यावेळी सर्व तरुणांना देण्यात आली.
याठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करताताना तुषार उमाळे यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण वर्धा जिल्ह्यात १० हजार वैचारिक व प्रशिक्षित तरुणांची फळी निर्माण करून याच तरुणांमधून जनतेची सेवा करणारे,त्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे लढाऊ वृत्तीचे नवीन नेतृत्व निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular