Saturday, May 28, 2022
Homeवर्धासंत साहित्य पुस्तकाचे वितरण.

संत साहित्य पुस्तकाचे वितरण.

सेवाग्राम: वं.राष्टसंताचे गुरूदेव श्री समर्थ आडकोजी महाराज यांच्या दोनशेव्या जन्म शताब्दी निमित्ताने गणपती उत्सव व वाढदिवसाचे औचित्य साधून वरूड येथील प्रशांत बळीरामजी अंबुलकर यांच्या निवासस्थानी पाच दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन बुधवारी १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले .यावेळी गणरायाचे पुजन, आरती करून शाळेकरी मुलांना बालगीते, बडबड गीते, श्री समर्थ आडकोजी महाराज यांच्या तैलचित्र व अन्य साहित्याचे वितरण परीसरातील मुलांना करण्यात आले.


येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बेलूरकर यांनी लहान मुलांना विविध बडबड गीते म्हणून गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्या प्रसंगी नव चैतन्य ओतून मुलांचा आनंद द्वीगुणीत करून साधेपणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक प्रविण अंबुलकर यांनी केले.यशस्वीतेसाठी परीसरातील मुलांनी कोरोना नियम पाळून सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular