आर्वी : येथील संजय नगरातील कंपोस्ट डेपोच्या बाजूला राजू गबने यांच्या शेतातल्या विहिरीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने संजयनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन मृतदेह बुधवारी 23 जून रोजी सकाळी दहा वाजता विहिरीबाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक मुलीचे वडील रात्री तीन वाजता लघुशंकेला उठले असता त्यांना मुलगी नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी रात्रीच धावाधाव करून शोध घेतला असता आढळून आली नाही. संजय नगर येथील नगरपालिका कंपोस्ट डेपो च्या बाजूला असलेल्या राजू गभने यांच्या शेतातील विहिरीवर तिचा काळ्या रंगाचा दुपट्टा दिसला. ती कपारीत अडकली होती.
त्यामुळे निलेश मडामे यांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता मृतदेह कपारीत अडकलेला दिसला.
त्यामुळे विहिरीत बाजीला दोर बांधून मृतदेह शेख जावेद शेख बशीर, राजेश नांदुरकर, अरबाज शहा प्रदीप बोरकर रवी घाडगे यांनी विहिरी बाहेर काढला आत्महत्येचे अद्यापही कारण कळू शकले नाही.
आर्वी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवानंद केकन , फौजदार सागर गिरी,राऊत ,उमेश कुंभरे आदींनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला आहे.