Monday, June 27, 2022
Homeवर्धासंक्रांत निमित्य सेलू नगर सुधार आघाडीचे वतीने महिलांना भेटवस्तू वाटप

संक्रांत निमित्य सेलू नगर सुधार आघाडीचे वतीने महिलांना भेटवस्तू वाटप

सेलू :- सेलू येथील विद्यादीप सभागृहात युवा सामाजीक कार्यकर्ते वरूनभाऊ दफ्तरी यांच्या नेतृत्वात महिलांचा हळद कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी महिलांना भेटवस्तू देवून संक्रांत सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक शैलेंद्रजी दफ्तरी नगर पंचायत गटनेते सेलू सुधार आघाडी, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच राजेंद्र मिश्रा, रेखाताई जैनेंद्र दफ्तरी,माजी जि.प सदस्य सारिकाताई देवतारे तसेच कार्यकर्ते माजी नगरसेवक वैशालीताई पाटील, नूतनताई झाडे, समीक्षाताई खोडे, रूखसार पठाण, शमशाद पठाण, पंकज दुबे,संदीप सांगोळकर, माजी नगरसेवक सनी खोडे, पवन राठी, हमीदभाई सैय्यद,नावीनकुमार पाटील , किशोर इरपाते, नितीन कळसकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular