आर्वी : श्री संत भानुदास महाराज संस्थान वर्धमनेरी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या श्री. सद्गुरू विद्यामंदिर, अंध विद्यालय, मूकबधिर विद्यालय, अस्थिव्यंग विद्यालय आणि गुरुकुल इंग्लिश कॉन्व्हेंट या सर्व शाळेची सामूहिक झेंडावंदन संदीप अग्रवाल रा. (तळेगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोणाची सर्व नियम पाळत शाळेच्या बँड पथकाने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
श्री. सद्गुरू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नांदे यांच्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व 26 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने तयार केलेली राज्यघटना अस्तित्वात आली. राज्यघटने प्रती आदर म्हणून आपण दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. असे महत्त्व सांगून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व विभागातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद कर्मचारी बांधव उपस्थित होते. यावेळी वर्ग 9 व 10 च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच दरवर्षी याच संस्थेत मोठ्या उत्साहात चार तासाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. परंतु कोरोणाचा काळ लक्षात घेता. सद्गुरु विद्यालयाच्या चमूने बँड पथकाने उपस्थितांचे स्वागत करून बँड राष्ट्रीय गीत म्हणून तिरंगी ध्वजास सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. व 73 वा प्रजासत्ताक दिन मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महोत्सव साजरा करण्यात आला. बँड पथकाचे संचलन अमोल वानखडे , जती तर सूत्रसंचालन प्रभाकर नेहारे यांनी केले. तसेच यावेळी श्री. सद्गुरू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नांदे , मूकबधिरचे मुख्याध्यापक विघ्ने , अस्थिव्यंगचे मुख्याध्यापक निमकर सर, व गुरुकुलचे बेहरे व उपस्थित आरु , देशमुख , गायकवाड, चौधरी, आणि सावरकर , वरेकर , वांदिले , जाने , ठोंबरे, खोड, डॉ. जाने, सर्व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.