समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते:-अतुल वांदीले
मनसे जिल्हाध्यक्ष,वर्धा
तालुका प्रतिनिधी
विकी (योगेंद्र) वाघमारे
हिंगणघाट
लोकमतचे संस्थापक संपादक श्रध्देय स्व.स्वातंत्रसैनिक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त साईसभागृह नंदोरी रोड, हिंगणघाट येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटक अतुल वांदिले मनसे जिल्हाध्यक्ष तर प्रमुख अतिथी भास्कर कलोडे ,पत्रकार यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्यामध्ये रुग्णांसाठी दरवर्षी अंदाजे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते कोरोना च्या काळामध्ये तर रक्ताच्या तुटवडा भयंकर जाणवला रक्त अभावी लोकांचे मूत्यू झाले.

रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. माणसाने कितीही मोठे शोध लावले तरीही कृत्रिमरित्या रक्त तयार करण्याचा शोध अद्यापही लागला नाही तेव्हा रक्तसाठी रक्तदान हाच एकमेव उपाय आहे या महारक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून अतुल वांदीले बोलतांना म्हणाले की,समाजाचे ऋण फेडण्याची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते हया संधीच सोनं करीत सर्वानी हे सर्वश्रेष्ठ दान करावे असे आवाहन करीत त्यांनी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनाचरित्र्यावर प्रकाश टाकला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनसाठी अमोल बोरकर जिल्हा उपाध्यक्ष मनसे, सुनील भुते जिल्हा सचिव, रमेश घंगारे, उमेश नेवारे, मारोती महाकाळकर, जगदीश वांदिले, राजू सिन्हा,बच्चू कलोडे, प्रशांत एकोणकर, निखिल भुते नरेश चिरकुटे अमोल मुडे, गोलू भुते, गोपाल कांबळे, हरीश वाघ, जीतू रघा,घाटे मिथुन चव्हाण, राजू खडसे आदींनी सहकार्य केले तर या रक्तदान शिबिरामध्ये एकनाथ रुपेश लाजुरकर ,दीपक चंदनी, कीर्तिकुमार ठाकरे ,आशिष ठाकरे, सुनील मेश्राम, सचिन कापसे, मयुरी कापसे ,दीपक धात्रक, विश्रांती कुटेवार, अनिकेत हिवाळे, विक्रम सैनी, रामेश्वर बावणे, अमित नागपुरे, सचिन भडे,संदीप रोडे,सागर सहारे, धीरज कोल्हे ,आकाश पिल्लेवार, निलेश कोयचाडे,विपिन रेवतकर, नीलेश शेंडे ,आशिष कापकर, संदीप भोयर ,अनंता माडे, पंकज परटक्के,योगिता कावळे,नितीन काळे,अमोल मुळे, सर्वश सोनकुसरे, शुभांगी धकाते, अक्षय पोटफोडे,राजू मुडे,अनिल सुर्यवंशी आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले .