Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाशेतकरी कामगार आंदोलन अखंड सुरू

शेतकरी कामगार आंदोलन अखंड सुरू

वर्धा ;
शेतकरी कामगार आंदोलन अखंड सुरू असलेल्या आंदोलकांनी आज
महात्मा गांधी यांच्या शहिद दिवशी आदराजली वाहण्यातआली.


दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सरकारने केलेला प्रायोजित हिंसाचाराचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. महात्मा गांधींना कृतिशील आदरांजली देण्यासाठी सामुहिक चिंतन कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 11.00 ते संंध्याकाळी 6.00 वा पर्यंत हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

संध्याकाळी 5.17 वा सामुहिक सर्वधर्मसमभाव प्रार्थना घेऊन आजच्या दिवसाचा समारोप करण्यात आला.
आज च्या सामुहिक चिंतन कार्यक्रमात सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंदन पाल, किसान अधिकार अभियान चे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, सत्यशोधक महिला किसान मंचच्या प्रा. नूतन माळवी, अँड. पूजा जाधव, तत्वज्ञ श्रीकांत बारहाते, शालिनी राजरत्न, पी. झेड. राजरत्न, आम आदमी पार्टीचे नितिन झाडे, मंगेश शेंडे, प्रमोद भोमले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार, अ. भा. अनिस च्या प्रा. सुचिता ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज इंगोले, रिपब्लिकन पक्षाचे मनोज तायडे, प्रभाकर चोंदे, करून महाबुधे, सुनील ढाले, माकपचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, संजय भगत, भैय्या देशकर, गजानन ढोरे, किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, किरण राऊत, रमेश खुर्गे, रवींद्र गावंडे, रामभाऊ भागवत, सर्वोदय मंडळाचे प्रशांत गुजर, रामभाऊ भागवत, विनोद अवथळे, नरेंद्र होरे, रसिका घिमे, आयटक चे रामभाऊ दाभेकर, चुडामन घवघवे, प्रभाकर धवने, भुमिपुत्र संघर्ष वाहिनी चे प्रविण कलाल, योगेश घोगरे, संजय जवादे, एम व्ही बागेश्वर, बहुजन समाज पार्टी चे मोहन राईकवार, श्रेया गोडे, समिर बोरकर आदींनी सहभाग घेतला होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular