हिंगणघाट : कारंजा चोकात दुर्गा माता मंदिर समोर बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस जयंतीचा कार्यक्रम २३ जानेवारी ला सकाळी १० वाजता
शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, उपजिल्हा प्रमुख राजू खुबसरे,नगरसेवक श्रीधर कोटकार, तालुका प्रमुख भोला चव्हान,
शहर प्रमुख सतिश ढोमने,महिला अध्यक्ष सुधा शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

यावेळी दीप प्रज्वलन करून बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर शहरांतील पर्यटन क्षेत्र असलेले पंच मुखी हनुमान मंदिर ,शालगडी देवस्थान परीसरात वूक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रकाश अनासाने,मुन्ना त्रिवेदी,शंकर मोहमारे,आदर्श गुजर आदी शिव सैनिक उपस्तीत होते.