वर्षाभऱ्यापासून पिण्याकरिता पान्याचा पत्ता नाही,
*लोकप्रतिनिधी ,प्रशासनाविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड असंतोष*
प्रशांत झाडें
सेलू : तालुक्यातील दहा हजार लोकसंख्या तसेच ग्रामपंचायत मध्ये 15 ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले हिंगणी येथील गेल्या कित्येक वर्षापासून भेडसावत असलेली जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्याकरिता शासनाने एक कोटी 33 लाख रुपयेचा निधी पाणीपुरवठा प्रकल्पाला देण्यात आला. पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा सुद्धा थाटामाटात पार पडला, परंतु एक वर्षापासून हिंगणीतील जनतेची तहान भागविण्याकरिता एक थेंब पाणी सुद्धा अजून पर्यंत मिळाले नाही.


हिंगणीतील जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्याकरिता शासनाकडून तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना 2017-18 मध्ये 2 लाख 25 हजार लिटर क्षमता असलेले जलकुंभ तसेच संपूर्ण गावात पाणीपुरवठा करण्याकरिता पाईपलाईन टाकून घरोघरी लोकांना नळ जोडणी करून पाणी मिळावे या दृष्टिकोनातून एक करोड 33 लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. प्रत्यक्ष पाणीपुरवठा योजनेचे कामही झाले, 26 जुलै 2020 एक वर्ष अगोदर लोकार्पण सोहळा पण थाटामाटात आटोपला.
संबंधित कामाच्या कंत्राटदाराचे संपूर्ण देयके सुद्धा अदा झाली, पाणी पुरवठा योजना चालू झाली म्हणून गावातील जनतेने अनामत रक्कम भरून नळ जोडणी करीता अर्ज सुद्धा केले, परंतु एक वर्षापासून कुणालाच एक थेंब सुद्धा पाणी मिळाले नाही, तसेच राम टेकडीवरील बांधण्यात आलेली पाण्याची टाकी सुद्धा अजून पर्यंत उघडी आणि कोरडीच आहे. म्हणून ही योजना कुचकामी ठरल्याची ओरड हिंगणी तील नागरिक करीत आहे.
Box.
आता पुढील काही दिवसांमध्ये जलजीवन योजनेमध्ये सर्वांना मोफत 3000 कनेक्शन देण्यात येणार आहे, तसेच हिंगणीतील एकही व्यक्तीने एक वर्षापासून नळ जोडणी करीता ग्रामपंचायत कडे अर्ज केलेला नाही,
ईश्वर मेश्रे,
ग्रामसचिव, ग्रामपंचायत कार्यालय हिंगणी
Box,
माझे कारकिर्दीमध्ये जवळपास पन्नास ते साठ लोकांनी नळजोडणी करिता अर्ज केले होते, ग्रामपंचायत कार्यालयात त्या लोकांनी कित्तेक चकरा मारल्या तसेच त्यांनी नळ जोडणी करिता अनामत रक्कम देखील भरली होती, परंतु ग्रामसेवक मेश्रे यांनी त्या लोकांची कुठलीही दखल न घेता अनामत रक्कम वापस केली.
शुभांगी अशोक मुडे,
माजी सरपंच हिंगणी.
Box,
संबंधित पाणीपुरवठाचा काँट्रॅक्त वर्धा येथील पाटील यांना देण्यात आला होता. ते काम योग्य न झाल्यामुळे मी लोकार्पण सोहळाला सुद्धा गेलो नव्हतो. आज पर्यंत हिंगणीतील एकही घरी नळजोडणी न झाल्यामुळे खंत वाटत आहे. तसेच आताही लोकांना पावसाळ्यात डहुळ पाणी प्यावे लागत आहे,
अनिस शेख,
पाणीपुरवठा समिती अध्यक्ष हिंगणी,
Box.
तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून आत्तापर्यंत आमच्याकडे पाणी पुरवठा योजनेच्या कागदपत्राची पूर्तता केल्या गेली नाही. तसेच त्या टाकीवरील लावण्यात आलेल्या मोटारीचे 35 हजार रुपयांचे तेव्हाचे बिल ग्रामपंचायतकडे आलेले आहे. ते कंत्राटदाराला भरण्यास सांगितले आहे.
दामिनी डेकाटे,
सरपंच, ग्रामपंचायत हिंगणी,