हिंगणघाट :
वर्धा जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवारी रात्री ८ वाजता पासून तर सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू केली आहे.

मात्र या टाळेबंदी दरम्यान आज सकाळी हिंगणघाट शहरातील मटन मार्केट मध्ये दोन मटन विक्रेते सर्रास मटन विक्री करीत असल्याचे माहिती नगरपरीषदेच्या कोरोना नियंत्रण पथकाला मिळताच पथक प्रमुख प्रविण काळे यांनी आपल्या सहकार्यांसह या ठिकाणी धाड टाकून पाहणी केली असता या ठिकाणी दोन मटन विक्रेते मटन विकतांना आढळून आले.यावेळी या दोन्ही मटन विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.हि कारवाई नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अनिल अनिल जगताप मार्गदर्शन कोरोना नियंत्रण पथक प्रमुख
प्रविण काळे,महैद्र नखते,सागर डेकाटे,किशोर पुजदेकर,दिपक ठाकरे रामदास तळवेकर ,रहुबखान पठान यांच्या सह पथकात सहभागी कर्मच्याऱ्यांनी केली आहे.