हिंगणघाट : येथील ऑटो चालकाने ऑटो मध्ये बसलेल्या प्रवाशांचे वीस हजार रुपये राहिल्याने ती रक्कम पोलिसांच्या स्वाधीन करून त्या प्रवाशाला दिल्याने ऑटो चालकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वडणेर येथे ऑटोचालक बंडू नरसिंग राठोड रा. हिंगणघाट यांनी आपले वाहन वडणेर बस स्टॉप वर क्रमांक MH 32 C 8346 मध्ये हिंगणघाट येथून काही पॅसेंजर बसवून आणून वडनेर येथे बस स्टॉप वर आणून सोडले व परत जात असतात त्याला त्याच्या ऑटो मध्ये एक पिशवी पडून दिसली ती पिशवी त्यांने उघडून बघितली असता पिशवीमध्ये वीस हजार रुपये रोख रक्कम होती सदर घटनेची माहिती ऑटो चालक याने पोलीस अमलदार प्रवीण बोधाणे पोलीस स्टेशन वडनेर व सैनिक सुरज मेश्राम यांना दिली, असता पोलीस अमलदार प्रवीण बोधाने, यांनी वडनेर बस स्टॉप चौक येथे जाऊन सदर रक्कम कोणाची आहे ,याबाबत विचारणा केली. असता एक सत्तर वर्षाच्या मातारा त्यांची सून व एक छोटा नातू पोलीस अंमलदार प्रवीण बोधने यांचा जवळ येऊन सदर रक्कम माझी आहे असे सांगितल्याने सदर आजोबांना नाव विचारले असता त्यांनी आपले नाव लक्ष्मण बापूराव शेलमाके.रहिवाशी रोडा. तालुका कळम जिल्हा यवतमाळ असे सांगितले सदर वीस हजार रुपये रक्कम पोलीस अंमलदार प्रवीण बोधने यांनी ऑटो चालक बंडू नरसिंग राठोड यांच्या हस्ते आजोबा लक्ष्मण बापूराव शेलमाके. रहिवाशी रोडा.तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांच्याकडे प्रामाणिक पणे परत केली,ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले.