वर्धा :
वर्धा नागपूर रस्त्यावरील पवनार जवळ श्रीकांत बांगडे यांचे शेतात रस्त्याला लागून असलेल्या विहरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. सदर मृतदेह हा तरुणाचा असल्याचे दिसून येते येणाऱ्या दुर्गंधी मुळे हा मृतदेह तीन चार दिवसापूर्वी चा असावा असा अंदाज बांधला जात आहे. मृतकाचा चेहरा हा विहिरीतील मासोळ्याने खाल्लेला दिसून आला.महामार्ग रस्त्यालगत असलेल्या या मृतदेहाला विहिरीतून बाहेर सेवाग्राम पोलीस काढला .
ही आत्महत्या की घातपाताचा प्रकार हे तपासाअंती निष्पन्न होईल.मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, उपनिरीक्षक ठाकूर,जामदार पांडे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.