करंजी भोगे येथील घटना
वर्धा : वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्यांनी सांगितलेल्या शेतकऱ्याच्या मोटार पंपाची वीज जोडणी करण्याकरिता घेलेली मजुराला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला.त्या मजुरांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.जखमी मजुरांचे नाव प्रकाश जिकार असे आहे.

मदनी सबस्टेशन अंतर्गत करंजी भोगे येथे जुलै महिन्यात वायरमन सेवानिवृत्त झाल्याने त्या जागेवर अद्याप नवीन वायरमन नियुक्त झाले नाही .त्यामुळे करंजी ,नागापूर ,सोडलापूर येथील घरगुती आणि शेतीची वीज दुरुस्तीचे काम प्रकाश जिकार करीत आहे .11 ऑगस्ट रोजी डॉ. नागपुरे यांचे शेतातील वीज खंडित झाल्याने त्यांनी शाखा अभियंता राहुल नाखले याना महिती दिली त्यानुसार नाखले यांनी प्रकाश जिकार यांना डॉ.नागपुरे यांची वीज डीपी वरून दुरुस्त करण्याचे सांगितले .त्यानुसार जिकार हे साडे चार वाजताच्या दरम्यान शेतात जाऊन वीज दुरुस्ती करीत असताना वीज धक्का लागला त्यात ते 35 टक्के भाजले .लगेच शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
प्रतिक्रिया
वीज कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी
गेल्या अनेक वर्षपासून वायरमन यांच्या हाताखाली अल्प मानधनावर काम करीत आहे .जुलै महिन्यात उरकुडे सेवानिवृत्त झाल्याने मला नाखले यांनी 10 हजार रु आउटसोर्सिंग मध्ये महिन्याला देतो कबुल केले.त्यानुसार मी पूर्णवेळ काम करीत होतो. मला आर्थिक सहाय्य कंपनीकडून मेळावे .
प्रकाश जिकार
जखमी मजूर