केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध
वर्धा :
पेट्रोलची दरवाढ एकशे पाच रुपये च्या वर लिटरला पोहचली, गॅसची दरवाढ प्रती सिलेंडर
1 हजार रुपये आहे. डिझेल शंभर रु लिटर झालेले आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक बजेट कोलमडले आहे . याला केंद्राच्या सरकारचे चुकीचे धोरण असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर व्यक्त केले.

आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार हाय-हायच्या घोषणा देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरिक्षक राजाभाऊ टाकसाळे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, माजी आमदार प्रा. राजु तिमांडे,महिलाध्यक्षा ज्योती देशमुख, प्रा. खलील खतीब, लक्ष्मीनारायण सोनवणे, निळकंठ पिसे, शिवराज शिेंदे, संदिप किटे, संजय काकडे, वासुदेव कोकाटे, मुन्ना झाडे, विनय डहाके, जिजाबाई राऊत, नितिन देशमुख, विणा दाते, शारदा केणे, विनोद पांडे, टि.सी. राऊत. प्रविण पेठे, सुनिल निमसटकर, लिना कडू, अंबादास वानखडे, नारायण मसराम, लईक फारुकी, आशिष लोखंडे, सचिन ठाकरे, सागर इंगळे, प्रफुल चतेकार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे कार्यकर्ते व महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.