घरातील कचऱ्याचे डबे तुंबले
आर्वी : नगरपरिषदेच्या घंटागाड्या 4 दिवसापासून बंद असल्याने नागरिकांची जिकडे तिकडे बोंबाबोंब होत आहे. वल्ली साहेब वार्डातील माजी नगराध्यक्ष सवालाखे यांच्या घरा जवळील परिसरातील घंटागाड्या चक्क 4 दिवसापासून बंद असल्याने घरातच 4 दिवसापासून पासून कचरा साचून ठेवा लागत आहे. घरातही किती दिवस कचरा साठवून ठेवणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

घरात कचरा ठेवून ठेवून कचऱ्याचा दुर्गंध पसरल्याने त्यातून आरोग्य धोक्यात येऊ शकते घरात कचरा ठेवू शकत नसल्याने घरातील कचरा बाहेर रस्त्यावर आणून टाकत असल्याने परिसरामध्ये कचऱ्याचे ठिक-ठिकाणी ढिगारे जमा झाले आहे.
याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने वारंवार नगरपालिकेकडे घनकचऱ्याच्या घंटागाड्या सुरू करा. अशी मागणी वार्डातील नागरिक करीत असून उडवाउडवीचे उत्तर देत आहे.
■ नगर परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून सुद्धा चार दिवसापासून घंटागाड्या बंद आहे. आज पाठवतो उद्या येऊन जाईल अशी उडवाउडवीचे उत्तर देत आहे.
आरीकर साहेब
आरोग्य विभाग अधिकारी