Monday, June 27, 2022
Homeवर्धावर्षभरापासून कोरोनामुळे घरात धिंगामस्ती

वर्षभरापासून कोरोनामुळे घरात धिंगामस्ती


बच्चेकंपनी रमली टीव्हीसमोर, मोबाईलवर,पालकांची मात्र वाढली चिडचिड


शांतीलाल गांधी प्रतिनिधी

समुद्रपूर-
गेल्या एका वर्षापासून कोरोणाचा प्रभाव असल्यामुळे प्राथमिक शाळा, कॉन्व्हेंट बंदच आहेत.लहान मुलांना घराबाहेर पडण्यास पालक मज्जाव करीत आहेत.त्यामुळे बहुतांश बच्चेकंपनी वर्षभरापासूनच घरातच धिंगामस्ती सुरु आहेत.दिवसभर टीव्हीसमोर,मोबाईल गुंतलेली आहेत. त्यातही सध्या आयपीएलचे सामने सुरू असल्याने क्रिकेटही मुले पाहतात.काहीजण घरातील बैठे खेळही खेळत आहेत.अर्थात मुलांच्या धिंगामस्तीमुळे पालकांची मात्र चिडचिड वाढली आहे.


कोरोणामुळे एक वर्षापासून नर्सरी,केजी वन,केजी टू प्राथमिक शाळा,कॉन्व्हेंट बंद आहेत,त्यामुळे विद्यार्थी घरीच धडे गिरवीत आहेत, शाळा ओस पडले असल्याचे चित्र आहे.दोन वर्षापासून कोणतीच परीक्षा न देताच विद्यार्थी पास होत असल्यामुळे शिक्षणाविषयी व परीक्षांबाबत विद्यार्थ्यात भीती राहिली नाही.त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून कोसो दूर जातो की,काय ही भीती आता पालकांना वाटत आहे. त्यातच गेल्या वर्षापासून शाळा नाही, अभ्यास नाही त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतले आहेत.
मोबाईलमधील विविध प्रकारे खेळ कार्टून,व्हिडिओ,गुगलवर वेगवेगळ्या साइटवर नवनवीन शोध घेत असल्याचे चित्र आहे,काही घरातील मुले टीव्हीवर विविध चित्रपट, मालिका गाणे,आयपीएल क्रिकेट स्पर्धा यात गुंतून घेत आहेत.शाळा नसल्यामुळे काहीजण शेतात जात असल्याचे चित्र आहे.याशिवाय कॅरम, विविध विविध प्रकारच्या गाण्याच्या भेंड्या,पुस्तक वाचन करीत असल्याचे चित्र आहे अर्थातच मुले घरी असल्यामुळे दिवसभर गोंधळ असतो.
त्यामुळे अनेकदा पालकही या घींगामस्तीला वैतागले आहेत.मुले सतत काही ना काही हट्ट करीत आहेत.मुलांचे हट्ट पुरवित्याना पालकांच्याही नाकीनऊ येत आहेत.


प्रतिक्रीया
अनेक कुटुंबात लहान मुलाबाबत तक्रारीचा सुर येतआहे.मुले घरातच असल्याने हट्टीपणा,चिडचिड प्रमाण वाढले आहे.सारखे टीव्ही आणि मोबाईलमुळे मुलांची मानसिकता बदलत आहे.पालकांनी जास्तीत जास्त मुलांना समजून घेणे आणि कृतिशील काही करायला सांगणे हाच भाग महत्त्वाचा आहे.मुले मुलेच असतात पालकांनी सारखी तक्रार करणे कमी करावे.


डॉक्टर मीनाक्षी गांधी


कोरोणामुळे वर्षभरापासून अवघ्या जगाचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.समाजातील सर्वच वयोगटाला याची झळ बसलेली आहेत.अशा स्थितीत पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.त्यांना समजून घ्यावे.पालकांनी वेळ मिळेल तेव्हा त्यांचा अभ्यास घ्यावा,शैक्षणिक ज्ञानाला कशी भर पडेल याचा विचार करावा.


नितीन बांगडे शिक्षक


गेल्या वर्षभरापासून शाळा सुरू नसल्यामुळे घरातच किती दिवस बसणार आहोत.त्यामुळे शाळा सुरू असल्या की धमाल करायला आवडते. परीक्षा निकालाची उत्सुकता असते. शाळा नसल्यामुळे घरात सतत राहणे कंटाळवाणे वाटत आहे.


साक्षी घोटे विद्यार्थीनी


कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षापासून शाळा,कॉन्व्हेंट, महाविद्यालय बंद असल्यामुळे मुले घरातच बसून आहे त्यामुळे नुसता गोंधळ गोंगाट सुरू असल्यामुळे घरातील इतर वैतागले असून,शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न पालकांना पडला आहे.


अमोल सांयकार पालक

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular