वर्धा :
सिव्हिल लाईन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी पोलीस वेल्फेअरने पेट्रोल पंप उभारण्यास सुरुवात केली त्यामुळे आंबेडकरी समाजात रोष निर्माण झाला आज स्वतंत्र दिनी बाजज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत विराट मोर्चा काढला.

पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,बहुजन समाज पार्टी,वंचित बहुजन आघाडी,समता सैनिक दल, भारतिय बौध्द महासभा,संभाजी ब्रिगेड,भीम आर्मी,भीम टायगर,झलकारी सेना,निर्माण सोशल फोरम,राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना यांच्या नेतृत्वाखाली मोर्च्याचे आयोजन केले.
वर्धा सिव्हिल लाईन येथिल शहराचे केंद्र बिंदू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या अगदी जवळ जिल्हा पोलिस वेल्फेअरने हेतुपुरस्सर, सूडबुद्धीने पेट्रोल पंप बांधकाम सुरु करुन आंबेडकरीच नव्हे तर भारतीय समाजाच्या भावना दुखावल्या आहे.या जागेवरून पेट्रोल पंप त्वरित हटविण्यात यावा अन्यथा संपुर्ण वर्धा जिल्यातच नव्हे तर महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल,या आंदोलनात कोणतीही हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकार,पालकमंत्री,जिल्हा पोलिस अधिक्षक,जिल्हाधिकारी यांची राहिल.
स्वातंत्रदिनी आंबेडकरी समाजाने केलेले हे जनआंदोलन पुढे हि अधिक तिव्र असेल,या सरकारने आंबेडकरी समाजाचा अंत पाहु नये.आशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.