-सुनिल केदार
प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापण दिन उत्साहात साजरा

वर्धा :- शासनाच्या प्रत्येक योजना जिल्हयातील शेवटच्या नागरिकांपर्यत, गोरगरिबाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करीत असून यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकांना हे सरकार आपलेसे वाटत आहे .महिलांची सुरक्षा, शिक्षण आरोग्य तसेच शेतक-यांचे व मजुरांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन कटिबद्ध असुन यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या लोकशाहीच्या दोन चाकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
ज्योतीबा फुले शेतीकरी कर्जमाफी, पिक कर्ज यासारख्या योजना जिल्हयामध्ये जनतेच्या मदतीने प्रशासनाने चोख राबविल्या आहेत. लोकांचा सहभागाने जितये योजना यशस्वीपणे राबविल्या जातात तिथे दक बाबासाहेब आंबेडकरांनी राबविलेली लोकशाही खऱ्या अर्थाने रुजली असे म्हणता येते. हेच राज्याच्या विकासाची द्योतक आहे. यासाठी लोकशाहीच्या दोन चाके असलेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधींनी राज्याच्या विकासात एकत्रितपणे काम केले तर राज्य निश्चित विकासात अग्रेसर राहू शकते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कोराना महामारीच्या संकटात महसूल विभाग, पोलिस विभाग, ग्राम विकास विभाग, नगर प्रशासन विभाग, सामाजीक संघटना, शिक्षक संघटना, व्यापारी, उद्योजक, लोकप्रतिनिधी, माध्यमे या प्रत्येकाने चांगली कामगिरी बजावून वर्धा जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हातभार लावला. जिल्ह्यातील गोर गरीब शेतकरी यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालकमंत्री म्हणजन मी स्वतः प्रयत्नशील आहे. अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला धाम नदी उंची वाढविण्याचा प्रश्न निकाली निघाला असून निविदा प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे वर्धा शहरातील नागरिकांचा पुढील 25 वर्षे पाण्याचा प्रश्न निकाली निघाली आहे. त्यामुळे वर्धा शहरातील जनतेला सवलतीच्या दरात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्याचे हस्ते जिल्हयातील शहिद जवानाच्या विरमातांचा सत्कार तसेच शहिद हरी लाखे यांची वीरमाता सिताबाई लाखे व अमित टिपले यांची विरमाता नलिनी टिपले यांच्या परिवाराला जमिनीचे पट्टे देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने ध्वज निधी संकलनाचे उद्दिष्ट वेळेच्या आधी पूर्ण केल्याबाबत जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस विभागाने वर्धा शहरातील मुत्थुट दरोडा प्रकरणात 12 तासात आरोपीस अटक केल्याबाबत उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलिस निरिक्षक निलेश ब्राम्हणे, सत्यजित बंडीवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र इंगळे, सहाय्यक फौजदार सलाम कुरेशी, जमादार प्रमोद पिसे, अनिल कांबळे, राजेंद्र जैसिंगपूर, पवन पन्नासे, विकास अवचट, संघसेन काबंळे, अभिजित वाघमारे, तसेच अन्न पदार्थ अपहार केल्याप्रकरणी पोलिस विभागाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष गजभिये, जितेंद्र चांदे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.