Saturday, June 25, 2022
Homeवर्धालोकनियुक्त सरकारची गळचेपी करणे हे घटनाविरोधी -- रंगा राचुरे

लोकनियुक्त सरकारची गळचेपी करणे हे घटनाविरोधी — रंगा राचुरे

वर्धा :
दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार जनतेच्या प्रत्येक मुलभूत गरजा पूर्ण करीत देशाला नवीन दिशा देण्याचे कार्य करीत आहे. हे देशातील केवळ धर्माच्या नावावर राजनीती करणाऱ्या मोदी सरकारला पचनी पडत नसल्यामुळे राज्य सरकारचे अधिकार काढण्याचे विधेयक लोकसभेत आणेल आहे. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यात अधिकारावरून पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारचे अधिकार संकुचित करून नायब राज्यपालांकडे सर्वच प्रस्ताव दाखल करून मान्यता घेणे बंधनकारक करणारे सुधारणा विधेयक भाजप सरकारने लोकसभेत मांडले आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी यास विरोध दर्शवत भाजप सरकार लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारच्या धोरनाचा निषेध वर्ध्यात करण्यात आला.

दिल्ली विधानसभेत भाजपचा धुव्वा उडवत आप चे तिसऱ्यांदा सरकार सत्तेत आले. त्या नंतरच्या महानगरपालिका फेर निवडणुकीतही भाजपा ला एकही जागा मिळाली नाही. दिल्लीतील सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनिक, आरोग्य सेवा, मोफत पाणी व वीज, महिलांना मोफत प्रवास, महिला सुरक्षा इत्यादी क्षेत्रात श्री अरविंद केजरीवाल सरकार उल्लेखनीय कार्य करीत आहे, त्यामुळे जनता आता केंद्र सरकार आणि इतर राज्य प्रश्न करायला लागले आहेत. त्यामुळे आप सरकारची नाकेबंदी करण्याचे धोरण भाजपा सरकार तयार करत आहे.

या पूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने असे आदेश काढत सर्व फायली नायब राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे मोहल्ला क्लिनिक व सीसीटीव्ही ची अंमलबजावणी रखडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री श्री केजरीवाल व त्यांचे सहकारी यांनी नायब राज्यपाल यांचे घरीच धरणे धरले होते. सुप्रीम कोर्टाच्या विशेष बेंचने यात स्पष्टता आणत राज्य सरकारच्या प्रस्तावाना राज्यपालांची मान्यता जरुरी नाही, फक्त माहिती देणे पुरेसे आहे असे सांगितले होते. त्यानंतर जनहिताच्या कामांना गती आली होती. असे असताना केंद्र सरकारने नवा दुरुस्ती प्रस्ताव आणत लोकनियुक्त सरकारचे अधिकार काढून घेण्याची मोहीम सुरु केली आहे.

आज दिल्लीतील सरकार
याचा बळी ठरले तर उद्या हेच धोरण महाराष्ट्रासारख्या विरोधी सरकारे सत्तेत असलेल्या सर्वच राज्यांच्या अधिकाराची गळचेपी केली जाण्याची शक्यता दिसते आहे. केंद्रातील भाजपा सरकार हे लोकांचे अधिकार कमी करण्याचे व घटनेतील तरतुदी विरोधात काम करत आहे अशी खरमरीत टीका आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे* .

निवडणुकीत प्रलोभने दाखवत, खोटी आश्वासने देत निवडून यायचे, तसे न झाल्यास दुसऱ्या पार्टीचे निवडून आलेले लोक प्रतिनिधी पळवायचे आणि तेही न जमल्यास मागील दरवाज्याने अधिकार काढून घ्यायचे, गळचेपी करायची असे भाजप ची रणनीती असून आम आदमी पार्टी सर्व स्थरावर याला विरोध करत आहे.

याचा निषेध म्हणून आज दिल्लीमध्ये केंद्र सरकार विरोधात मार्च आयोजित केला आहे, याचे महाराष्ट्र आम आदमी पार्टी तसेच वर्धा जिल्हा आप समर्थन करीत आहे. तसेच केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular