बाल गणेश उत्सव मंडळ साध्या पद्धतीने करणार गणेशोत्सव कोरोना माहामारीची करणार जनजागृती
■समुद्रपूर■
वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करणार्या बाल गणेश उत्सव मंडळ सलग दुसऱ्या वर्षी लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच यावेळी सर्व प्रकारच्या खर्चाला फाटा देण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षा पासून बाल गणेश उत्सव मंडळ एक गाव एक गणपती साजरा करीत आहे. गावातील नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात उत्कृष्टपणे विविध कार्यक्रमांचेही आयोजन करतात: तसेच दर वर्षी गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यावर या मंडळाची नियमित भर दिला आहे. गणेश उत्सव काळात विधायक कामे करण्याची ही मंडळी आघाडीवर आहे. त्यामुळे या मंडळाच्या कार्याची दखल आतापर्यंत अनेक संस्थांनी व सरकार घेतली आहे. या मंडळाला जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वर प्रथम पुरस्कार देण्यात आले आहे. कोरोणा काळातही या मंडळाने विविध उपक्रम राबवून नागरिकांची सेवा करण्याचा प्राधान्य दिले होते.मात्र गेल्या वर्षी कोरोणाच्या संकटामुळे या मंडळांनी लहान मंडप घालून अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला होता.तसेच यावर्षी बाल गणेश उत्सव मंडळाने चार फुटाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.लहान मंडप घातला जाणार आहे.तसेच गेल्या वर्षी कोरोणाच्या संकटामुळे वर्गणी न मागता जे लोक स्व-खुशीने देणगी दिली त्याच्याकडूनच देणगी स्वीकारण्यात आली होती.त्याच प्रमाणे यावर्षी वर्गणी न मात्र अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव होणार आहे.तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे.
प्रतिक्रिया
गेल्या अनेक वर्षापासून मंडळाकडून अतिशय चांगल्या प्रकारे गणेशउत्सव साजरा केला जातो.यावेळी कोरोणाचे संकट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने आणि कोरोणाचे सर्व नियम पाळून गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .
सौरभ आत्राम अध्यक्ष