कोरोनासह थॅलॅसिमिया व सिकलसेल रुग्णांसाठी रक्ताची
राष्ट्रीय सेवा योजनेचे वर्धा जिल्हा समन्वयक
प्रा.मेघशाम ढाकरे यांचे जनतेला आव्हान

समुद्रपूर
जिल्ह्यात कोरोणाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोना विषाणू पासून बचाव व्हावा यासाठी येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तीसाठी मोफत लसीकरण सुरू झाले आहे. हा एकदा लस घेतल्यानंतर किमान ६० रक्तदान करता येत नाही.अशा परीस्थीतीत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची तातडीची निकट लक्षात घेतात.युवकांनी लस घेण्यापूर्वी एक वेळ रक्तदान करून कोरोनासह थॅलॅसिमिया,सिकलसेल आधी आजारग्रस्त रुग्णांचा जीव वाचवावा असे आव्हान समुद्रपूर येथील प्रा.मेघशाम ढाकरे केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा १ मे पासून सुरू झाला आहे.१८ वर्षापुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. घेतल्यानंतर ६० दिवस आपणास रक्तदान करता येत नाही.त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे.आता रुग्णालय मध्ये कोविड आणि नॉन कोविड अशा दोन रुग्णांना उपचार केले जात आहे.त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता भासत आहे.त्यातच कोरोना लस घेतल्यावर ६० दिवसापर्यंत रक्तदान करता येणार नाही.त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोराणाची प्रतिबंधात्मक लगेच लस घ्या. कोरोणामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.राज्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याच कोवीड रुग्णांना तर रक्तामधील प्लाजमाची मागणी मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलमधून वाढलेली दिसत आहे. डोनरची कमतरता भासत आहे. यासोबत सिकलसेल व रुग्णांना सुद्धा दर महिन्याला रक्त द्यावे लागते.या पार्श्वभूमीवर युवकांनी आपली देशप्रति जबाबदारी ओळखून कोरोनाच्या राष्ट्रीय संकटांमध्ये लस घेण्यापूर्वी एकदा अवश्य रक्तदान करून गंभीर रुग्णांना जीववाचण्याची आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे वर्धा जिल्हा समन्वयक प्रा.मेघशाम ढाकरे यांनी आव्हान केले आहे.