नियमाचे पालन कठोर करून समारंभ सुरू ठेवण्याची मागणी
समुद्रपूूर : एका विवाह सोहळ्याला अनेक व्यवसायिक अवलंबून असतात. छोट्यापासुन ते मोठ्या व्यवसायिकांचा धंदा या सोहळ्यावर अवलंबून असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येते.त्यामुळे लग्नसमारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे पालन कठोर करून सुरु ठेवण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
लग्न सोहळा हा जीवनातील महत्त्वाचा संस्कार आहे.

यासंस्कारात माणूस कोणताही तडजोड करत नाही.आयुष्यात लग्न एकदाच होत त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येक प्रत्येक माणसाची इच्छा असते.अलीकडे लग्न घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केले जाते.ते सर्व सोयी एकाच ठिकाणी मीळ्तात तसेच कुटुंबातील व्यक्तीची धावपळ होत नाही म्हणून लॉन्स निवडले जातात एका लग्नावर जवळपास दहा व्यवसायिक अवलंबून असल्यामुळे त्यांची कुटुंबे आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर चालतो शिवाय लॉन्सच्या मालकाचा विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात
यंदा मात्र जवळपास एक वर्षे लग्न सोहळा बंद होता लोकांनी घरा पुढे लग्न लावली अवध्या एक महिन्यापासून लग्नसोहळ्याला परवानगी दिली होती कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा गर्दी टाळण्यासाठी लग्न अवघ्या पन्नास माणसाच्या उपस्थित करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे मात्र आठवडी बाजार बाजार समित्या निवडणूका बाजारपेठ सुरू आहे आणि लग्नसोहळे मोजक्या मानसात साजरे करण्याचे फर्मान सोडल्यामुळे अनेक व्यवसायीकांवर उपासमारीचे वेळ आलेली आहे शासन आदेशानुसार सोशल अंतर आणि मास्क लावून नियमाचे पालन करत लग्नसोहळा सुरू ठेवावेत अशी मागणी समुद्रपूर येथील व्यापारी असो अध्यक्ष शांतीलाल गांधी रणजीत चावरे प्रवीण तेलतुंबडे निखिल डगवार निर्मल भोयर यांनी केली.
बॉक्स
एका लोन वर विमान 50 बेरोजगार तरुण आणि वीस व्यवसायिक अवलंबून असतात त्यांचे कुटुंब यावर अवलंबून असतात कोरोणा जरी वाढला असला तरी सोशल अंतर आणि इतर नियमाचे पालन करणाऱ्या लॉन्स शासनाने परवानगी द्यावी यातून छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार नाही अन्यथा जवळपास व्यवसाय बंद पडतील त्यात माझा मंगल कार्यालयात व्यवसाय आहे शेखर तेलतुंबडे