Saturday, June 25, 2022
Homeवर्धालग्नसराई हुकल्याने बांगडी व्यवसायिक अडचणीत

लग्नसराई हुकल्याने बांगडी व्यवसायिक अडचणीत


पोटाची चिंता:दुसरीकडे कोरोणाची भीती असल्याने व्यवसायिक दुहेरी संकटात

मनिष गांधी समुद्रपूर तालुका प्रतिनिधी
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोणाने डोकेवर काढल्याने बारा बलुतेदारांची विविध व्यवसाय,उद्योग-धंदे बंद असल्याने उपासमार सुरू आहे.बारा बलुतेदारांपैकी एक बांगडी व्यवसायवर उपजीविका करणाऱ्यावर तर कोरोना कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा बांगडी भरणारा कासार सध्या हालाखीचे जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता तर दुसरीकडे कोरोनाची भीती या दुहेरी संकटात हे सापडले आहेत.


सण उत्सव सार्वजनिक कार्यक्रम यासह लग्नसमारंभ यावर शासनाने बंदी घातल्याने अनेक बाराबलुतेदारांची उद्योग धंदे बंद आहेत.एप्रिल मे या दोन महिन्यात लग्नसराई मोठ्या प्रमाणात असते,पण सलग दुसऱ्या वर्षी या दोन महिन्यातच कोरोनामुळे हा हंगाम झालेला नाही. लग्नसराई दोन-तीन महिने व्यापार करून बाकीच्या काळात बऱ्यापैकी व्यवसाय नाही झाला तरी आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर उत्तम प्रकारे होत होता.
लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मोटर मुहूर्तमेढ
रोवल्यावरच खऱ्या अर्थाने लग्नसोहळ्याची सुरवात होते.पण दोन वर्षापासून हे सोहळेही सोशल डिस्टंसिंगमुळे कमी गर्दीत करून मोजक्या नातेवाईकात पार्थ पाडण्याचे शासनाने आदेश असल्यामुळे लग्न समारंभ होत आहेत,पण बाकी रीतीरिवाजाला डामडीलाला फाटा दिल्याने पोटावर पाय आला आहे.


कसे राहणार अंतर
सोशल डिस्टंसिंग पाळून अनेक व्यवसाय सुरु असून ते करता येण्यासारखे आहेत,पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टंसिंग पाळून करता येणे शक्य नाही.

ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटलं तर जवळून संपर्क येतोच,त्यामुळे सोशल डिस्टंन्सपाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यवसायिकांना एक दिव्यच आहे.
प्रतिक्रीया
बांगडी व्यवसाय कोरोणापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून,हॅन्डग्लोज वापरून बांगडी व्यवसाय करता येणे शक्य नाही कोरोणापासून पासून वाचण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच पर्याय आहे तरी शासनाने बांगडी व्यवसायिकांना आर्थिक मदत द्यावी तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व जगू शकतील.
शेख अशफाक बांगडी व्यवसायिक समुद्रपूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular