Sunday, May 29, 2022
Homeवर्धाराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आर.आर.सी.विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आर.आर.सी.विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा.

शरद शेंद्रे
आष्टी : आष्टी येथील अप्रोच मार्गावरील ओबोडधोबड मुरूम टाकल्याने रस्त्याने जाताना एका मुलीचा अपघात होवून गंभीर झाल्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

याबाबत असे की,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल गजरे यांची मुलगी ऋतुजा(१०)काही कामानिमित्त रंगार पेंडाजवळील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अप्रोच मार्गावरील अस्ताव्यस्त मुरूम कामामुळे सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाली. त्यात ऋतुजाचे दोन दात मुळासकट पडल्याने गंभीर जखमी झाली. लागलीच तिला अमरावती येथील दंतरोग तज्ज्ञाकडे उपचारासाठी दाखल केले असता अवाढ्यव्य खर्च व वर्षभर नितांत काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासाठी महामार्ग निर्मिती आर.आर.सी. कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष झाल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दिलेल्या तक्रारीतनमूद केली आहे. सदर महामार्गावर गैरसोयीचे अनेक ठिकाणं असून अपघाताला निमत्रण देणारे ठरत असल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular