रस्त्याचे भूमिपूजन होऊनही कामाला सुरुवात झाली नाही
कारंजा : आर्वी मतदारसंघात सन 2018 मध्ये तत्कालीन सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्याच्या मजबुतीकरणला अर्थसंकल्प मधून 53 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. यातून सर्वाधिक 36 कोटी एकट्या कारंजा तालुक्यातील रस्त्याच्या देण्यात आले होते यामध्ये कारंजा – नारा -माणिकरवाडा- साहूर , काकडा – परसोडी सेलगाव (ल) बोरी -धर्ती -काटोल, चिंचोली- येणगाव- उमरी , कन्नमवार ग्राम- आजनडोह, ठाणेगाव – खरसखांडा , यासह सावळी (खुर्द) – आगरगाव – धानोली , बांगडापूर – सुकळी बाई एम डी आर – ७ या रस्त्याने निधी मंजूर करण्यात आला होता. या सर्व रस्त्याच्या निविदा पार पडल्या यात अनेक कंत्राटदार एजंशी ने कामे घेण्यात आले.

मात्र सावळी (खुर्द)- आगरगाव – धानोली व बांगडपूर सुकळीबाई या रस्त्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. बांगडपूर – सुकळी बाई रस्त्याचे अर्धे काम काटोल येथील ठाकूर कन्ट्रक्शन यांनी केले आहे तर उर्वरित रस्त्याचे काम मिश्रा कन्ट्रक्शन यांना मिळाले होते या रस्त्याचे कामाचे दोन वर्षांपूर्वी आजी माजी आमदार यांनी भूमिपूजन केले असून अजूनही या रस्त्याचे काम करण्यात आले नाही तसेच सावळी (खुर्द) आगरगाव धानोली यरस्त्याचे काम कटेरिया कन्ट्रक्शन यांनी घेतले होते मात्र दोन्ही रस्त्याचे काम अजूनही करण्यात आले नाही त्यामुळे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बांगडापूर सुकळीबाई रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले असल्याने येणाजाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे अनेकदा या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात घडले आहे. आज सकाळी सिंदिविहिरी येथील ग्रामस्थ कन्नमवार ग्राम येथे रुग्णालयात जात असताना वाटेतच त्याचा अपघात झाला त्यामुळे तेथील नागरिकांनी रस्त्याचे काम होत नसल्याने रस्त्यातील खड्ड्यात बेशरामचे झाडे लावून निषेध केला. या परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्याचाही निषेध करण्यात आला. या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही काम सुरू झाले नसल्याने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.