नाचणगाव- शिरपूर रस्ता भगवान भरोसे
सा बां उपविभाग कुंभकर्णी झोपेत
विजय गोपाल:
नाचणगाव ते शिरपूर रस्ता हा गेल्या दोन वर्षापासून खड्डामय झाला आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न रस्त्याने जाणाऱ्यांना पडतो आहे.या रस्त्याची किमान डागडुजी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
या रस्त्यावरून अनेक वाहनांची ये-जा असते. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 277 असून भोपाळ- हैदराबाद कमी अंतराचा म्हणूनही हा रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी उपविभाग पुलगाव यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक अपघात खड्ड्यांमुळे घडले आहे. त्या अपघातात अनेकांचे जीव गेले आणि अनेक लोक जखमी सुद्धा झाले आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरवली आहे. या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापासून साधा मुरूम टाकण्याचे सौजन्य बांधकाम विभागाने दाखवले नाही.

या रस्त्यावर खड्डे यांची जणू मालिकाच आहे त्यामुळेच हा रस्ता रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असाही प्रश्न उपस्थित होत आहे या रस्त्यावर असलेले खड्डे त्यामुळे होणारा प्रवाशांना नाहक त्रास यांना या त्रासाला कोणालाही कुणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधीसुद्धा पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेचे मत आपल्या पदरात पाडून घेऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाही का असा सवाल नागरिक करीत आहे.
या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास परिसरातील नागरिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.