Tuesday, June 28, 2022
Homeवर्धारयतेला समान वागणूक देणारा निधर्मी आदर्श राजा म्हणजे शिवाजी महाराज

रयतेला समान वागणूक देणारा निधर्मी आदर्श राजा म्हणजे शिवाजी महाराज

समुद्रपूर :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रत्येकाला समान न्याय मिळत ते सर्वधर्मसमभाव पाळणारे राजे त्याच्या राज्यात कुठलाच भेदभाव दिसून येत नव्हता, त्याच्या लष्करी अधिकारी,सेवक हे मुस्लिम सह विविध समाजातील होते हे विविध प्रसंगातून इतिहास तज्ञ डॉ. विठ्ठल चंदनखेडे यांनी शिवजयंती च्या कार्यक्रमात व्यक्त केले.
स्थानिक विद्या विकास महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना,व शैक्षणिक व सांस्कृतिक समितीच्या वतीने शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे होते. प्रमुख मार्गदर्शक इतिहास विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल चंदनखेडे होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. मेघश्याम ढाकरे,ग्रँथपाल डॉ. प्रमोद अलोने , कनिष्ठ विभागाचे रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा. विलास बैलमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन शैक्षणिक व संस्कृतिक समितीचे डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले. आभार प्रा चंद्रकांत सातपुते यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. रमेश निखाडे, प्रा महाकाळे, प्रा प्रकाश तळे, प्रा मोहोड,प्रा कोरेकर प्रा वालदे, हर्षद उमरे,बंटी तेलतुंबडे, धनेश रंगारी आदींनी परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular