आर्वी :

रंग स्पर्श क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या हस्त कलेतून रेखाटले गणपतीची विविध रूप . गणपतीच्या उत्साहा मध्ये रंग स्पर्श आर्टचे संचालक यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी रंग स्पर्श स्पर्धे मध्ये भाग घेऊन विविध चित्र रेखाटली होती. यामध्ये इयत्ता पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच रंग स्पर्शचे विद्यार्थ्यांनी श्री गणेशजी स्थापन दिवसापासून विसर्जन दिवसापर्यंत गणपतीचे चित्र काढण्याचा संकल्प या ठिकाणी
विद्यार्थ्यांनी घेतला असून यामध्ये पेन्सिल , कलर, तसेच ब्लॅक बॉल पेन, पेस्टल
व वॉटर कलर पोस्टर कलर इत्यादी माध्यमातून गणपतीचे विविध चित्रे काढली असून अजूनही चित्र काढण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एकूण 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच यामध्ये आर्वीतील नव्हे तर ऑनलाइनच्या माध्यमातून पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, यवतमाळ, तळेगाव, आष्टी,वाढोणा, अमेरिका, येथील मुलाचा समावेश आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काढलेली गणपतीचे चित्र दाखवून सहभाग नोंदविला आहे.