Tuesday, June 28, 2022
Homeवर्धारंग स्पर्श आर्ट क्लासेस तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

रंग स्पर्श आर्ट क्लासेस तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

आर्वी : शिक्षक दिनाच्या निमित्ताने दि.5 सप्टेंबर रोजी इ . पहिली ते इ . बारावी पर्यंतचे विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार चित्राचे विषय देऊन स्पर्धा घेण्यात येणार आहे.


या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील नवनिर्माण क्षमता जागृत करण्यासाठी रंग स्पर्श आर्ट क्लासेस तर्फ केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. तरी या प्रयत्नांना यश मिळवुन देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे रंग स्पर्श आर्ट क्लासेस चे मुख्य संचालक व स्पर्धेचे आयोजक चित्रकार सचिन वि राऊत यांनी आवाहन केले आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी व अधिक माहितीसाठी सचिन राऊत यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular