…………………………………
हिंगणघाट 4/6 चित्रकला -साहित्यकला आणि साहित्येत्तर कला यांचा परस्पर संबंध आहे.एकुणच लेखन व त्यातला आशय हे सर्व आपल्या चित्रांमध्ये,रंगामध्ये अभिव्यक्त करण्याच सामर्थ्य असलेल्या अत्यंत मोजक्या चित्रकारांमध्ये पनवेल येथील चित्रकार प्रकाश पाटील यांच नाव घेतल्या जाते.प्रकाश पाटील हे विख्यात वास्तववादी शैलीत चित्रानिर्मिती करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम चित्रकार आहेत.त्यांच्या चित्रकारीने संपूर्ण जगाला व्यापले आहे.

त्यांची चित्रे जीवनाच्या अभ्यासकांशी संवाद साधत असते.त्यांची चित्रकारी जगण्याचे अनेक संदर्भ दर्शकांना सांगत असते.त्यांच्या वास्तववादी शैलीतील दर्जेदार चित्रनिर्मितीत व्यक्तीचित्रे,प्रसंगचित्रे,निसर्गचित्रे,स्थिरवस्तू चित्रे इत्यादींचा समावेश आहे.अॕक्रेलीक कलर हे त्यांचे आवडते माध्यम असले तरी पेस्टल,Soft पेस्टल,पेन्सिल ,जलरंग अशा माध्यमांचाही त्यांनी भरपूर वापर करून घेतला आहे.बऱ्याच चित्रांमध्ये Mix media या आधुनिक तंत्राचाही त्यांनी उपायोग केल्याचे दिसून येते.जलरंग हे माध्यम हाताळण्यास तसे कठीण आहे.कारण ते वापरण्यासाठी रंगावर हुकमत हवी.याशिवाय सर्जनशिलताही हवी. पण प्रकाश पाटलांनी जलरंग या माध्यमाचाही भरपूर उपयोग अगदी सहजतेने केलेला आहे.त्यांनी जलरंगात काढलेली निसर्गचित्रे लक्षवेधी आहेत.अलीकडे ते अमुर्त चित्रकारितेकडे ते वळलेले दिसतात.’नारी’ हा विषय घेऊन स्रीच्या विविध रूपांच्या अमुर्त शैलीतील कलाकृतींचे आणि अश्व,Waterfall,elephant,Buddha,Ganesh ह्या विषयांवरील अमुर्त शैलीतील चित्रांचे अनेक प्रदर्शने त्यांनी भरवलेली आहेत.समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नही त्यांनी आपल्या चित्रांमधून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.कोरोनाच्या काळात आषाढी सोहळा रद्द झाल्यामुळे विठुरायाच्या लाखो भक्तांना पंढरपूरची वारी करता आली नाही.त्यांना विठुरायाचे दर्शन घेता आले नाही.या काळात प्रकाश पाटील यांनी वाळू कलेतून विठुरायाचे भावविश्व उलगडून दाखविले.विठुरायाचे आणि पालखी सोहळ्यातील विविध चित्र ,प्रसंग त्यांनी वाळू कलेतून रेखाटले.वाळू कलेतून रेखाटलेल्या या चित्रांचा संग्रह सुद्धा नुकताच पुस्तकरूपाने प्रकाशित झालेला आहे.या चित्रग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रांचा आशय कळावा म्हणून चित्राच्या बाजूला त्यांनी संत ज्ञानोबा आणि तुकोबा यांचे अभंग दिलेले आहेतअसे विचार प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे प्रकाश पाटील यांच्या चित्रकारीतेवर बोलतांना व्यक्त केले. ते श्रेयस वाचनालयाने आयोजित ” ओळख चित्रकारांची” या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मंचावर प्रा.शैलेंद्र गजभिये,प्रा.जयंत दाणी,सुजाता नगराळे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाला वाचानालयातील निमंत्रीत निवडक वाचकांची उपस्थिती होती.