Monday, June 27, 2022
Homeवर्धायुवक काँग्रेसच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्थळ व रस्ते निर्जंतुकीकरण

युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्थळ व रस्ते निर्जंतुकीकरण

स्व. प्रभाताई राव यांच्या पुण्यतिथीतीचे औचित्य

सिंदी रेल्वे : स्व. प्रभाताई राव यांच्या पुण्यतिथी निमित्त सिंदी शहर युवक काँग्रेस च्या वतीने संपूर्ण सिंदी शहरातील सार्वजनिक स्थळ आणि रस्ते कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी (ता. २६)निर्जंतुकरण करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे संपूर्ण देशात हाहाकार पसरला आहे. शासन आपल्या परीने वाढते कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अमलबजावणी करीत आहेत अशा परिस्थितीत विविध पक्ष संघटना सामाजिक संस्था या कामात सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहे.


…………………. याच पाश्र्वभूमीवर काॅग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल कै.प्रभाताई राव यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सिंदी शहर युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष अफ़जल बेरा यांच्या नेत्तृत्वात शहरातील सार्वजनिक स्थळ आणि प्रमुख रस्ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनीट्रायझरची फवारणी करण्याचा उपक्रम राबवून कै. प्रभाताईना आदरांजली वाहण्यात आली.
या उपक्रमात युवक काँग्रेस चे कार्यकर्ते आशिष डंभारे , सोहेल शेख , अमर भॊस्कर , चिंटू भोयर , कुणाल तळवेकर , प्रणय अवचट, अनिकेत भोयर , अंशू अवचट , आयुष पालिवाल , अमोल गायधने , आदिनी परिश्रम घेतले

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular