तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

हिंगणघाट शहरात वाढत्या पाण्याच्या समस्या लक्षात घेत युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश कुंनचवार यांनी संत तुकडोजी वॉर्ड प्रभाग क्रमांक १६ मध्ये नागरिकांच्या पाण्याच्या समस्या लक्षात घेत स्वखर्चातून दिले बोरवेलची व्यवस्था करून दिली.
प्रभागातील नागरिक हे नगरपालिकेचे पाण्याच्या प्रश्नासाठी वारंवार नगरपालिकेचे प्रांगणामध्ये जात असे व बऱ्याच प्रमाणात पाण्यासाठी तक्रारी करून सुद्धा नगरपालिका प्रशासन नाणी कोणतीही दखल घेतले नाही, नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती या पाण्याच्या समस्याचे गांभीर्य लक्षात घेता अंकुश कुंचनवार यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने बोरवेल चे बांधकाम सुरु करून लोकांची पाण्याची समस्या दूर केली.
कायमस्वरूपी पाण्याचे व्यवस्था करून प्रभाग क्रमांक १६
मधील नागरिकांसाठी उत्तम व्यवस्था केली आहे.
त्यांच्या या कुशल कार्याबद्दल हिंगणघाट शहराच्या वतीने कौतुक होत आहे.
या सहकार्य मध्ये मिलिंद कावळे,नितीन ढगे,अभिषेक श्रावने,रितू मोघे,भूषण भांडे,निलेश नेवारे,
कुणाल कळसकर,अजय खोंडे, योगेश तडस तसेच प्रभागातील नागरिक तिथे उपस्थित होते.