Saturday, June 25, 2022
Homeवर्धामोपेड गाडी चोरट्याना अटक

मोपेड गाडी चोरट्याना अटक

वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही
वर्धा : सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या इसमाची
मोपेड गाडी चोरट्याने चोरून नेली .त्या चोरट्याना स्थानिक गुन्हे प्रगतिकरण शाखेने गाडी सह अटक केली.
तरूणा राम खेडकर, वय (44) रा. सोनेवाडी वर्धा यांनी दिनांक 11एप्रिल रोजी सामान्य रूग्णालय, वर्धा येथे त्याचे मालकीचे टीव्हीएस ज्यूपीटर सिल्वर रंगाची मोपेड गाडी क्र एमएच 32 एपी 4964 नी गेले होते. मोपेड गाडी वार्ड क्रमांक 53 जवळ उभी करून टेस्ट करीता गेले. टेस्ट करून परत मोपेड गाडी ठेवल्या ठीकाणी आले असता त्याची मोपेड गाडी दिसुन न आल्याने त्याचे पत्नीने त्याचे पतीचे मालकीची टीव्हीएस ज्यूपीटर सिल्वर रंगाची मोपेड गाडी क्र एमएच 32-एपी 4964 किमंत 65000/– रू कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या बाबत पो.स्टे. वर्धा शहर येथे दिनांक 11 एप्रिल रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.


मुखबिर कडुन मिळालेल्या माहिती वरून सदर गुन्ह्यात आरोपी एैबाज शेख युसुफ शेख, (वय 21) रा. हनुमान मंदीरा जवळ, वार्ड क्र 26, पुलफैल, वर्धा . आफताब अलि सैय्यद अख्तर अलि (वय 21) रा. माँडेल हायस्कुल जव, तारफैल, वर्धा याना दयाल नगर, देवळी नाका, वर्धा येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेली टी.व्ही.एस. ज्यूपीटर सिल्वर रंगाची मोपेड गाडी क्र एमएच 32 एपी 4964 किंमत 65000/- रू ची ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रषांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुश जगताप यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा सचिन इंगोले, शशीकांत जयस्वाल, दिपक जंगले, राजेंद्र ढगे व सलमान शेख यांनी केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular