वर्धा –

आज दि. 12 जाने. 202l ला कुसुम महिला विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विणाताई चौधरी तर प्रमुख अतिथी संगीता देशमुख ,
रेखाताई देशमुख उपस्थित होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला इंटक अध्यक्षा अर्चन भोमले उपस्थित होत्या .
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
पाहुण्यांच्या स्वागतानंतर अतिथींनी राजमाता जिजाउ मांसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावर माहिती सांगितली .
अध्यक्षीय भाषणात अर्चना भोमले म्हणाल्या राजमाता जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याची मुहुर्तमेठ रोवून समाजाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या दोन छत्रपतिंना घडविले . स्त्रियांना मुकतीचा मार्ग दाखवून या विदर्भ कन्येने महान इतिहास आमच्या समोर ठेवला हा त्यांचा इतिहास प्रत्येक स्त्रीने स्मरणात ठेवायला हवा . तसेच स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्वा बद्दल व कार्याबद्दल माहिती दिली .
या कार्यक्रमाचे संचलन भाग्यश्री चौधरी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ रुपाली बुरघाटे यांनी केले . या कार्यक्रमास वैष्णवी देशमुख अर्चना बुरघाटे, वर्षा निवल, मेघा चावरे , प्रियंका चौधरी, करुणा चौधरी, संध्या चौधरी, सोनू ठावरे, आरती राऊत, कोमल चोधरी आदी उपस्थित होत्या .