Monday, June 27, 2022
Homeवर्धामुख्य बाजार पूर्वीच्या ठिकाणीच भरविण्यात यावा

मुख्य बाजार पूर्वीच्या ठिकाणीच भरविण्यात यावा

शिवसेनेची मागणी : प्रशासनाला निवेदन
वर्धा : बाजार समितीच्या यार्डातील असुविधा लक्षात घेता बजाज चौकातील बाजारातच भाजी बाजार भरविण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदनातून केली.


कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बजाज चौकातील मुख्य भाजी बाजारात मागील ४० ते ५० वर्षांपासून व्यावसायिक भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. येथे शेतकºयांना शेतमाल आणणेही सोईस्कर ठरते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही भाजी विक्रेत्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन हे कारण सांगत आदेश नसताना भाजी बाजार कसा भरविला, दंडात्मक कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली. भाजी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात स्थानांतरित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. मात्र, यार्डात वीजजोडणी, शेड, स्व्छतागृह याशिवाय इतर सुविधांचा अभाव आहे. भाजीपाल्याची सुरक्षाही वाºयावर आहे. यामुळे व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिता बजाज चौकातील बाजारात भाजी बाजार भरविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे, गणेश इखार, अमोल कडू,दिलीप भुजाडे, आनंद मंशानी, रईफ पठाण, सुनील लाखे, विलास लाखे, आरिफ शेख, दत्तात्रय गोहत्रे, गणेश चौधरी, सचिन पिसे, अरुण उप्परवार, आशा नंदरधने, चंद्रशेखर देशकर, नारायण ढोके, विशाल तिवारी, राजू कडू आदी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular