सेलू: हिंगणी येथील यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव दौ. गीरडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .

या कार्यक्रमाला यशवंत ग्रामीण संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष समीर देशमुख , संस्थेच्या जनरल सेक्रेटरी प्रतिभा निशाने तसेच यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव मनोहरराव निशाने उपस्थित होते .
संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते अशोक गीरडे यांना शाल , श्रीफळ व भेटवस्तू देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी गीरडे कार्याबदल त्यांचे अभिनंदन केले .गीरडे सरांनी आपल्या जीवनात शाळेला जे योगदान दिले व कौटुंबिक जबादारी एवढेच महत्व शाळेतील कार्याला दिले या त्याच्या गुणाबद्दल सन्माननीय अध्यक्षांनी त्यांचा गौरव केला. संस्थेच्या वतीने धन्यवाद मानले आणी भविष्यात सुध्दा संस्थेला आपण मार्गदर्शन करावे अशी विनंती केली . अशाच प्रकारे सर्व शिक्षकांनी सुद्धा शाळेची प्रगती कशी होईल या कडे विशेष लक्ष देवून कार्य करावे अश्या सुचना शिक्षकांना केल्या तसेच संस्थेच्या जनरल सेक्रेटरी यांनी सुध्दा गीरडे यांच्या कार्याबद्दल गुणगौरव केला . याप्रसंगी यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव मनोहरराव निशाने यांनी सुध्दा त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल गौरव केला . शाळेच्या पर्यवेक्षिका सौ तोडासे यांनी गिरडे सरांच्या कार्यावर प्रकाश टाकला . शाळेतील जेष्ठ शिक्षिका सौ. वरटकर , कु काटकर ( शिक्षक प्रतिनिधी ) , कु मालेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन श्री इंगोले व आभार प्रदर्शन श्री. ढवळे यांनी केले . या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .