कोरोनाच्या सावटात शेती संकटात; सूक्ष्म नियोजनाची गरज
समुद्रपूर
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सध्या जिल्ह्यात कडक लॉकडाउन घोषित झालेआहे.सर्व आस्थापने बंद करण्यात आले आहेत,मात्र पावसाळा पंधरा दिवसांवर आला असताना लॉकडाऊन वाढले आहे,तर शेती पेरणार?कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावर आहे.जर कृषी सेवा केंद्रांना परवानगी दिली,तर पुन्हा गर्दी वाढण्याची भीती आहे.या परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि सूक्ष्म नियोजन केले,तर यामधून मार्ग निघून खरिपाची पेरणी पूर्ण होण्यास अडचण येणार. नाही.
सध्या जिल्ह्यात सर्व दुकाने बंद आहेत.जमावबंदी व संचारबंदी लागू आहे,जिल्हा प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मेहनत घेत आहे,मात्र निसर्गचक्र या परिस्थितीत प्रशासनासाठी काळजीचा विषय झाला आहे.सध्या मे महिना अर्धा झाला आहे.जून महिन्यात पेरणीचा लगबग सुरू होणार आहे.
लॉकडाऊने पीक कर्ज वाटपात अडचणीत असताना खते व बियाणे लॉकडाऊन मुळे कुलूपबंद झाले आहेत.त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने कृषी सेवा केंद्र उघडण्याची परवानगी दिली तर आठ दिवसात प्रचंड गर्दी होणार आहे. परिणामी गेल्या महिन्यातभर कोरोना साखळी तोडण्यासाठी घेतलेली मेहनत वाया जाण्याची भीती आहे.
या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने खरीप नियोजन अग्रक्रमावर घेऊन प्रशासनातील इतर विभागाची मदत घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. कारण खते व बियाण्याचे वाटप केवळ पंधरा दिवस चालणारी प्रक्रिया आहे.कृषी विभागासह इतर विभागातील मनुष्यबळाची सांगड घातली गेली तर ही समस्या निकाली निघू शकेल.
जिल्हा प्रशासनाने विशेष आदेश काढून प्रशासनातील इतर विभागाचे मनुष्यबळ केवळ आठ दिवसासाठी या नियोजनासाठी वापरणे गरजेचे आहे.शक्यतो शेतकऱ्याच्या मागणीनुसार गावात खते होती त्यांना पोचवीतांना त्याच तालुक्यातील कृषी सेवा केंद्र निवडण्यात यावी.सातबारा उतारा किंवा ऑनलाईन चा तिढा नसावा.
त्याच बरोबर मागणी एवढा खतासाठी उपलब्ध करणे आवश्यक असेल याचेही नियोजन करणे आवश्यक आहे.कृषी सेवा केंद्रांना गावे वाटून देताना त्याच्याजवळील साठा लक्षात घेने आवश्यक आहे.त्यामुळे गावातील तलाठी ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना पु कोणाचा किती? खतसाठ गावात येणार याची आगाऊ सूचना द्यावी,जेणेकरून गर्दी न होता कोरोना नियम पाळत खरीप निर्धीक होईल.