स्पर्धा वाढल्याने आर्थिक संकटात वाढ शांतीलाल गांधी
समुद्रपूर प्रतिनिधी
फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार म्हणत माती तुडवून मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन विविध प्रकारची भांडी तयार करणारा कुंभार हा महागाईच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन व्यवसाय करीत आहे. या व्यवसायात श्रम अधिक आहेत.मात्र त्या तुलनेत याला मोल मिळत नाही.

आधुनिक युगात स्टील,पितळ ॲल्युमिनियम ,लोखंड सह, प्लास्टिकचा वापर वाढला आहे,तरी उन्हाळ्याच्या दिवसात माठ,राजन, सुरई अशा पारंपारिक वस्तूंना अद्यातही मागणी आहे.ग्रामीण भागातील आठवडी बाजारात उन्हाचा पारा वाढला असल्याने माठा सह मातीच्या विविध भांड्याची दुकाने आता दिसू लागली आहेत.
अजून मातीच्या भांड्याचे आकर्षण कायम आहे.मातीची भांडी जुन्या काळ्याची आठवण करून देतात.पूर्वी घरोघरी केवळ मातीच्या भांड्याचा सर्वाधिक वापर होत होता.स्वयंपाक करण्यासाठी,धान्य साठवण्यासाठी मातीची भांडी वापरली जायची.हल्ली विविध धातूसह फायबर,लोखंड,प्लास्टिकच्या वस्तूंचा कुंभार समाजाचा व्यवसाय हा फक्त पोटापुरताच उरला आहे. कुंभार समाज आजही अपेक्षितांचे यांचे जीवन जगत आहे.
उन्हाळ्यामुळे जीवाची लाही-लाही होत असताना माठातील थंडगार . अमृता सारखे वाटते.गरिबांचा फ्रीज म्हणून पहिली पसंती माठाला असते,तर फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील थंड पाणी शारीरिक दृष्ट्या चांगले असते,तेव्हा आता हा माठ घडणारा कुंभार समाज खूप कष्टाच्या व प्रतिकूल परिस्थितीत जगत आहे.
चार महिने असते ग्राहकांची मागणी
उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळावे व आपनासही पैशाचा आधार मिळून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी,यासाठी कुंभार माठ तयार करतात.या समाजाचा मुख्य व्यवसाय माती पासून विविध प्रकारची भांडी करणे आहे. थंड पाण्यासाठी माठ,सुरई,राजन ग्रामीण भागात अजूनही वापरले जातात.उन्हाळ्याचे चार महिन्यात मातीच्या माठाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.मात्र हे सारे घडविणारे कुंभार अपेक्षित असल्याचे वास्तव आहे.