Tuesday, June 28, 2022
Homeवर्धामाऊन्ट कारमेल कॉन्वेट स्कुल मधील कोरोना काळातील शिक्षण शुल्क माफ करा:-

माऊन्ट कारमेल कॉन्वेट स्कुल मधील कोरोना काळातील शिक्षण शुल्क माफ करा:-

पालकांनी दिले खासदार आणि आमदारांना निवेदन

तालुका प्रतिनिधी अमोल झाडे समुद्रपुर

समुद्रपुर:-
शासनाने कोविड १९ मुळे शाळेने विध्यार्थाकडून कोणतेही शुल्क आकारू नये अशे आदेश पारीत केले असतांना समुद्रपूर येथील माऊंट कॉन्वेट शाळेच्या व्यवस्थापनाकडून शुल्क भरण्यास जबरजस्ती करण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संबंधित शाळेविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी खासदार रामदास तडस आणि आमदार समीर कुणावार यांना निवेदनातून केली आहे.


कोरोना काळातील कोणतेही शेक्षणिक शुल्क घेऊ नये अशा प्रकारची मागणी पालक वर्गानी प्रशासन व शाळा व्यवस्थापनाला केली होती. मात्र सदर शाळा व्यवस्थापन हे पालकांना वारंवार शुल्क भरण्याचा तगादा लावत असल्यामुळे पालक वर्गानी आ. समिर कुणावार व खासदार रामदास तडस यांचे कडे धाव घेत सदर निवेदन सादर करीत शाळा व्यवस्थापनाला समज देऊन सदर शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
सदर निवेदन देते वेळी सचिन गावंडे, प्रविण तेलतुंबडे, अशोक डगवार, राम काळे, मनोज थुटे, लहू निकोरे, भोला भोयर, जितेंद्र मंगेकर, प्रशांत भगत, सुधाकर उमाटे, गुरुदास देवडे , दिनेश गुडवार, उत्तम घुमडे, सुरेश दळणे, संतोष धावडे, उल्हास गणविर, अरूण चिकणे, अमोल लोहकरे, विजय रंगारी , सह मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.
आता पालकांना खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार हे पालकांना न्याय मिळवून देतिल का या कडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular