Monday, June 27, 2022
Homeवर्धामहाराष्ट्र राज्य कुस्तिगिर परिषदेची निवड चाचणीहिंगणघाट : येथील वीरा स्पोर्टिंग क्लब आणि...

महाराष्ट्र राज्य कुस्तिगिर परिषदेची निवड चाचणी
हिंगणघाट : येथील वीरा स्पोर्टिंग क्लब आणि महाराष्ट्र राज्य कुस्तिगिर परिषदेच्या वतीने ६४ वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2020-21 साठी वर्धा जिल्हा निवड चाचणी डॉ.बि आर आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथे घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जवादे आणि प्रमुख पाहुने डॉ.जुहि जवादे होत्या.


विविध गटांमध्ये कुस्तीसाठी निवड चाचणी घेण्यात आली, कुस्ती स्पर्धेमध्ये महेश माकडे वजन गट गादी विभाग, ५७ प्रेमांशु जवादे,६१ शिवम् चौधरी ,६५ गौरव मुजबैले,७० प्रज्वल वाटकर ,७४ संकेत बोरकर, ७९ नवनात भुसनर , ८६ सुमित भुते,९२ तेजस कारववटकर, ९७ महाराष्ट्र केसरी गट राहुल नागटीलक.
विभाग ५७ प्रफुल पेटमवार,
६१ सारंग सहारे,६५ प्रज्वल सहारे, ७०० आकाश बडगर,७४ योगेश हिंगे, ७९ रमाकांत घ्यारे,८६ सौरभ रननवारे, ९२ सम्राट कांबळे,९७ जगदिश पेटकर, या सर्व खेळाडूंची महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली व विजेत्या खेळाडूंना अनिल जवादे यांनी शुभेच्या दिल्या.
नवनात भुसनर व प्रवीण जवादे यांनी संचालन केले, संजय भुते यानी आभार मानले.

 या स्पर्धेकरिता  अजय मुळे, सम्राट काबळे,अमोल सायंकाळ, प्रतीक तराळे,रोशन डेकाटे,सुमित हिंगे,रोहित गोटेकर,अमित कावले, रोहित मुळे,सौरभ डहाळकर,रमन शेराम,शेरु डेकाटे व क्रीडा क्षेत्रातील  खेळाडूनी सहकार्य केले.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular