Monday, June 27, 2022
Homeवर्धामहाबळा येथे रक्तदान शिबिर,यंग स्टार बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन

महाबळा येथे रक्तदान शिबिर,
यंग स्टार बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन

सेलू :- तालुक्यातील भारतीय सैन्याचे गाव म्हणून ख्याती असलेले महाबळा येथे यंग स्टार बहुउद्देशीय संस्था व गट ग्रामपंचायत महाबळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी राजी करण्यात आले . या शिबिरात गावातील ५० रक्तदात्यांनी आपले रक्त दान केले.

महाबळा येथे रक्तदान शिबिर हे प्रथमच झाले असून गावकऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. अशी माहिती भारतीय सैन्य दलाच्या माजी सैनिक लक्ष्मण गोमासे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालय वर्धा येथील चमू उपस्थित होती.

या कार्यक्रमास महाबळा यंग स्टार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक पुरुषोत्तम बजाईत, माजी सैनिक लक्ष्मण गोमासे, माजी सैनिक मुकेश भावरकर, माजी सैनिक मोहन गोमासे, माजी सैनिक युवराज चांभारे, सरपंच ज्योत्सना पोहाने , गावकरी व यंग स्टार संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular