Monday, June 27, 2022
Homeवर्धामहाडिजिटल मीडिया असोसिएशनच्या राज्य प्रमुखपदी प्रणय ढोले

महाडिजिटल मीडिया असोसिएशनच्या राज्य प्रमुखपदी प्रणय ढोले

वर्धा : महा डिजिटल मीडिया ही राज्यातील पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना आहे. महाडिजिटल मीडिया असोसिएशन स्वनियामक संस्थेच्या राज्य प्रमुख तथा मानव संसाधन व माहितीपदी पत्रकार प्रणय राजेंद्र ढोले यांची निवड करण्यात आली.


मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी संघटनेचे संस्थापक ॲड. अद्वैत चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष दत्तराव नाईकनवरे, प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे, कोषाध्यक्ष सैफन शेख, प्रदेश संघटक महादेव हरणे यांच्यासह महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी सूचनांचे पालन करून मास्क आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून ही बैठक पार पडली. यात राज्यभरातील डिजिटल मीडियाच्या विकास आणि वाटचालीबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच वेब पोर्टल आणि सोशल माध्यमांतील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी महाडिजिटल मीडिया असोसिएशनचे काम वाढविण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर सभासद नोंदणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular