Tuesday, June 28, 2022
Homeवर्धामराठा समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन
सेवाग्राम : अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पाच मागण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सोमवारला देण्यात आले.


निवेदनातून ओबीसी आरक्षण साठी इम्पीरीकल डाटा राज्य मागास आयोग मार्फत संकलीत करण्यात येणार आहे.अशाच पध्दतीने नव्याने मराठा समाजाचा सुध्दा इम्पीरीकल डाटा करीता सर्व्हेक्षण करून मराठा समाजाला ५० टक्के मर्यादेच्या आत विशेष आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा.तसेच एम.पी.एस.सी.व निवड मंडळाद्वारे एस.इ.बी.सी.गटातून ४१३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.परंतु कोरोनामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत.आता मात्र एस‌इ.बी.सी.आरक्षण रद्द झाल्याने निवड झालेल्या‌ विद्यार्थ्यांना इ.डब्लू.एस‌.व खुल्या प्रवर्गातून नियुक्त्या दिलेल्या जाणार आहे.परंतु मेरीट नुसार जे विद्यार्थी दोन्ही मध्ये निवडल्या जाणार नाही त्यांच्यावर मात्र अन्याय होणार आहे.त्यामुळे अन्याय दुर करण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांच्या नियुक्त्या कराव्या.
कोरोना काळात बी.ई.,बी.फार्म,एम.बी.बी.एस.,एम.बी.ए.अशा प्रकारचे शिक्षण देणारे महाविद्यालय बंद होती.तरी महाविद्यालयांनी पूर्ण शुल्क घेतले आहे.चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांना शुल्क कमी घेण्याच्या सूचना देण्यात याव्या.वर्ग ८ ते १० वी प्रमाणे महविद्यालये सुरू करण्यात यावे.
तीन वर्षांच्या आर्या पंकज स्नेहा टाकोने या चिमुकली ने २०जुन २०२१ रोजी १ किमी अंतर विक्रमी वेळेत धाऊन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले,जिल्ह्याचे नाव जगात नोंदविले आहे.पुढील तयारीसाठी मानधनासह मार्गदर्शन शासनाकडून मिळावे.
पवनार येथील शेतकरी रविंद्र विठृठलराव निंबाळकर यांच्या शेतीतील वादळामुळे केळी व पंपईच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी दोन लाख रूपया प्रमाणे देण्यात यावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.
निवेदन देतांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, महिला जिल्हाध्यक्ष रोहीनी बाबर,कल्पना निंबाळकर, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद टाले,कोषाध्यक्ष प्रा.उमाकांत डुकरे, सरचिटणीस अभिजित जांभुळकर,पवन मगर, सुनील निंबाळकर,प्रा.ॠषिकांत मेसेकर, रमेश निंबाळकर, सतिश भांडवलदार इ.उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

2 COMMENTS

Most Popular