Saturday, June 25, 2022
Homeवर्धामंगल कार्यालयातील लग्र सोहळे आता शेतामध्ये

मंगल कार्यालयातील लग्र सोहळे आता शेतामध्ये


तालुक्यातील ग्रामीन भागातिल स्थिती वधू-वरांची कुटुंबांचीही पंसती


समुद्रपूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत.यामुळे ग्रामीण भागात लग्नसोहळ्यासाठी मंगल कार्यालय व मंदिरऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे.ग्रामीण भागातील अनेक विवाह सोह के शेतीमध्ये होताना दिसत आहेत.


राज्यात लॉकडाउन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळा होताना दिसत आहे. त्यामुळे खर्च आला मोठा आळा बसला तसेच मोजक्याच त्यांच्या आप्तेष्टांच्या उपस्थित पुणे गर्दी होऊ नये यासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.विवाह समारंभासाठी निश्चित करून दिलेल्या संख्या थोडी वाढली तरी चालते असेही बोलले जात आहे. त्यामुळे हा शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकड़ील निवडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
विवाह हा जीवनातील महत्त्वाचा सोहळा असतो.या समारंभाबाबत अनेकांची इच्छा अपेक्षा असतात.विवाह सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा जेवढी वराडी मंडळीची उपस्थिती तेवढेच मोठे लग्न म्हणून पत्रिका,मूळ पत्रिका हजारोने दिल्यात जायच्या जेवणावळी उठवायच्या त्यासाठी वेगवेगळी मेनू तयार करायचे.परंतु हे सर्व आताच्या काळात तरी स्वप्नवत झाले आहे.
अत्तराऐवजी सॅनिटायझर तर फुलांऐवजी मास्क
अगोदर विवाह सोहळा प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर व सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे.आता मात्र त्याची जागा सॅनिटायझर ने घेतली असून,आलेल्या पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.अनेक मुलांच्या हातात सॅनिटायझरच्या बॉटल दिसत असुन,पाहुण्यांच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात आहे.


मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फूल आणि अक्षता दिल्या जायच्या त्या आता त्या तुझी आलेल्या पाहुण्यांना मास्क अक्षता दिल्या जात आहे. विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.
शेतातील आखाड्यावर स्वयंपाक
शेतात एक छोटासा मंडप आजूबाजूला असलेली झाडाची सावली तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे.आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडाचा आसरा घेत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular