Saturday, June 25, 2022
Homeवर्धाभोसा-सिंदी रस्त्याचे काम अद्यापही अपुर्णच..

भोसा-सिंदी रस्त्याचे काम अद्यापही अपुर्णच..

पावसामुळे रस्ता झाला चिखलमय.

त्रस्त ग्रामस्थांनी आणि विविध संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

सिंदी रेल्वे : मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या भोसा-सिंदी या रस्त्याचे काम पावसाळा सुरू झाला तरी पुर्ण न झाल्यांने ग्रामस्थांनी त्रिवर नाराजी व्यक्त करीत दिला आंदोलनाचा इशारा….!


सविस्तर वृत्त असे की सिंदी ते भोसा रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु असुन बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे अद्याप पुर्ण होवु शकला नाही. विशेष म्हणजे या रस्त्याची अत्यंत खासता हालत पाहता या रस्त्यावरून प्रवास करने कठीन व्होवुन बसले होते याबाबत समंधीत विभागाला अनेक निवेदन दिली तरी काहीही होत नोव्हते परिणामता आधार संघटनेने अर्ध दफन आंदोलनाचा इशारा देताच आमदार समीर कुणावार यांनी लगेच दखल देत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून चार कोटी मंजूर करीत रस्ता मंजुर करुन आणला. मात्र दुर्भाग्य म्हणावे या रस्त्याचे दोन वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अद्याप पुर्ण व्होवू शकले नाही. पावसाला सुरुवात झाल्यांने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे.अशा परिस्थितीत रस्त्यावरून प्रवास करने जीकरीचे झाले आहे. अनेक गाडी चालक दररोज येथे कोसळतात अनेकांना दुखापत होते त्यात रात्री अपरात्री जाण्याचा योग आला तर चांगलीच फजितीच होते.
या सर्व दररोजच्या त्रासाला कंटाळून गावकर्‍यांनी तसेच विविध संघटनांनी रस्त्याबाबत रस्त्या वरती उतरून जिल्हाधिकारी ते विधानभवना पर्यंत आमची धाव असणार आहे जर काही दिवसात कामास विलंब झाला यास सर्वस्व जबाबदारी संबंधित विभागाची असेल या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष , आधार संघटना , ग्रामपंचायत भोसा उपसरपंच श्रीमती नमिता मंहनतारे , ग्राम सदस्य महेश अवचट , बंटी चौधरी तसेच वायगाव( बैल) , उमरा , पारडी , गौळ ,सिंदी रेल्वे येथील नागरीक तसेच माझी सरपंच व संघटना याबाबत आंदोलन छेडणार असल्याचा गर्भरीत इशारा दिला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular