वर्धा :
३ फेब्रुवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान उत्तम मेटॅलिक स्टील प्लांट मध्ये मेंटेनन्स चे काम सुरू असताना फर्नेस मधील गरम राख कर्तव्यावर हजर असलेल्या मजुरांच्या अंगावर उडाली. यामध्ये ३८ कामगार होरपळले होते. उपचाराकरिता १८ कामगारांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वर्धा शहराच्या नजीक असलेल्या भूगाव येथील उत्तम गालवा स्टील प्लांटमधील फर्नेस मधून उडालेल्या गरम राखेने ३८ कामगार आगीत होरपळले होते. नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका मजुराचा आज १४ फेब्रुवारीला सकाळी सात वाजता बारा दिवसानंतर मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या कामागराचे अभिषेक भोंमिक असे नाव आहे.
३ फेब्रुवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान उत्तम मेटॅलिक स्टील प्लांट मध्ये मेंटेनन्स चे काम सुरू असताना फर्नेस मधील गरम राख कर्तव्यावर हजर असलेल्या मजुरांच्या अंगावर उडाली. यामध्ये ३८ कामगार होरपळले होते. उपचाराकरिता १८ कामगारांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी अभिषेक भौमिक वय ३३. राहणार वर्धमान नगर, कलकत्ता याचा आज सकाळी १४ फेब्रुवारीला मृत्यू झाला.
कंपनीमध्ये मेन्टेनन्स सुरु होता. या कामासाठी काही मजुरांना बोलवले होते त्यापैकी अभिषेक भौमिक एक होता. एक दिवस अगोदर त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मृत्यूशी झुंज देत आज अभिषेकने प्राण सोडले.
१६ कामगारांना रुग्णालयातून सुट्टी
या घटनेमध्ये एकूण ३८ कामगार जखमी झाले होते. या पैकी १६ कामगारांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. १८ कामगार ऑरेंज सिटी नागपूर येथे उपचार घेत होते. यापैकी आज एकाचा मृत्यू झाला. ४ कामगार सावंगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
कंपनीतर्फे प्रत्येकाला एक लाख रुपयांची मदत
या घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक कामगाराला उत्तम गालवा मेटॅलिक कंपनीने एक लाख रुपये मदत दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
कंपनीचे उत्पादन बंद
कंपनीच्या देखभालीसाठीच १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान कंपनीचे मेंटेनन्स सुरु करण्यात आले होते. त्यामुळे कंपनीचे उत्पादन या दिवसात होणार नव्हते. सध्या कंपनीला कोणत्याही कामाला परवानगी नाही. चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाल्याने जिल्याचे पालकमंत्री सुनील केदार ,राज्यमंत्री बकचू