वर्धा :
तालुक्यातील भिडी हे गाव अनेक वर्षा पासून विविध समस्यांच्या विळख्यात अडकलेले होते. पारंपारीक रावसाहेब, अण्णासाहेब ची मानसिकता असणाऱ्या लोकांचे वर्चस्व ग्रामपंचायत वर असे पर्यंत भिडीकर नागरिक हे त्रस्त होते.

परंतु माजी मुख्यमंत्री दे्वेंद्र फडणवीस यांच्या थेट जनतेतुन सरपंच या निर्णयामुळे मार्च 2019 मध्ये भिडी वासियांना पहिल्यांदा सचिन चंपतराव भिडे च्या रूपात जनसमस्यांची जाण असणारा शिक्षित पदवीधर सरपंच मिळाला.तेंव्हा पासून भिडी ग्रामपंचायत ही फार अल्पकाळात नागरिकांचे बरेचसे प्रश्न सोडविण्यात यशस्वी ठरली आहे. जुन्या जर्जर पाईपलाईन ची दुरुस्ती, जनावरांना पिण्याच्या पाण्याचे हौद, घन कचरा निवारण,तळणी चौफुली वर बस थांब्याची उभारणी,गावातील मुख्य मार्गा वरील अतिक्रमण, इत्यादी समस्या प्राथमिकतेने कायमच्या निकालात काढल्या.अगोदर ग्रामस्थ सडकेच्या दोन्ही बाजूला शेणखत गोळा करीत होते. त्यामुळे अस्वछ ता पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते. सचिन बिरे यांनी आपल्या कल्पनेतुन शेणखतासाठी विटांचे न्याडप बांधून संपूर्ण विदर्भाला स्वच्छतेच्या भिडी पॅटर्नची ओळख करून दिली.नाली बांधणी साठी निधीची टंचाई असून सुद्धा विविध फंड ओढून आणले आणि नवीन वसाहती मधील सांडपाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडवली.बसस्टॅन्ड नजीकची ग्रापं ची विहीर अनेक वर्षा पासून क्षतिग्रस्त होऊन बुजली होती. या विहिरीच्या नवीन बांधकामासाठी 15 व्या वित्त आयोगा मध्ये दोन लाखाची तरतूद करवून घेण्यात सरपंच सचिन बिरे यशस्वी झाले. गावाच्या मुख्य मार्गाचे सौंदर्यकरण करून एका बाजूला शोभेच्या झाडांची रोवण केली. त्याला हिरव्या नेट चे सरंक्षण देऊन सौंदर्यामध्ये भर घातली. भिडी मध्ये प्रवेश करताच बँक ऑफ इंडिया चौका मधील सौंदर्यकरण हे नवीन नेतृत्वाच्या कार्याची पावती निश्चितच देते.उरलेल्या समस्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन सरपंच बिरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले.